तालुका :प्रतिनिधी राजेंद्र दिवटे
मुख्यमंत्री लाडकी बहिण कुटुंब भेट अभियान
महाराष्ट्रातील महिला भगिनी सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवत आहे,अशातच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पात्र महिला लाभार्थी यांच्या कुटुंबापर्यत जाऊन, त्यांना शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी गावोगावी जाऊन शासनाच्या योजनांची माहिती देत आहेत दि.10 ऑक्टोबर रोजी ठाणापाडा गटातील ग्रामपंचायत निरगुडे येथे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पात्र लाभार्थ्यांना भेट देऊन शासकीय योजनांची माहिती दिली.व दिवाळीची भाऊबीज म्हणून महिला भगिनींना साड्या वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी तालुका प्रमुख रविंद्र भोये, उपजिल्हा प्रमुख मिथुन राऊत, अल्पसंख्याक प्रमुख मुख्तार सय्यद, कार्यालय प्रमुख अशोक लांघे, भरत खोटरे, सरपंच संतोष तुंगार, अंबादास बोरसे, अक्षय मोरे, विठ्ठल पवार, नारायण बदादे, ज्ञानेश्वर भोये, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.