शिरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत नेरपिंगळाई येथे शांतता समितीची बैठक

 



अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केले मार्गदर्शन



   मोर्शी प्रतिनिधी प्रमोद घाटे : दिनांक 11/10/2024 रोजी पाच ते सहा च्या दरम्यान अपर पोलीस अधीक्षक सा., अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाबपुरी संस्थान नेरपिंगलाई येथे पो. स्टे. हददीतील शांतता समिती सदस्य पोलीस मित्र,महिला दक्षता समिती सदस्य पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, मुस्लिम बांधव मस्जिद ट्रस्ट कमिटी सदस्य व दुर्गा/शारदा देवी मंडळाचे पदाधिकारी,व पत्रकार बांधव यांची नवरात्र उत्सव संबंधाने संयुक्त शांतता कमिटी मिटिंग घेण्यात आली. 

      संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या धार्मिक घटनेचे पडसाद गावामध्ये होवू नये. व कोणीही होणाऱ्या घटनेसंबंधाने कायदा हातात न घेण्याबाबत समज दिली. तसेच दुर्गा मंडळाचे पदाधिकारी यांना विसर्जन मिरवणुकीमध्ये आक्षेपार्ह गाणे वाजवू नये व लेझर लाईटचा वापर न करण्याबाबत समज दिली. तसेच नवरात्र उत्सव अनुषंगाने आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर पोलीस पाटील यांची मिटिंग घेऊन दुर्गा विसर्जन संबंधाने पोलीस पाटील यांच्या जबाबदारी व कर्तव्य याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले.सदर मिटींगला 200 ते 250 महिला व पुरुष हजर होते.

Post a Comment

Previous Post Next Post