बदलापूर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-गेली नऊ दिवस नवरात्रोत्सव महाराष्ट्र उत्साहात संपन्न झाला.नवरात्रोत्सव म्हटल की महिला नवदुर्गा आल्याच,पण महिला वर्षाचे ३६५दिवस आपल्या कार्यात कार्यमग्न असतात.नवरात्रोत्सवात नारी शक्तीचा सन्मान करणे म्हणजे त्या महिलांचा तो सर्व श्रेष्ठ मानसन्मानच असतो.याच नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून बदलापूर येथील सरकारमान्य पदविका अभ्यासक्रम,चेतन एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत दि लिटील एंजल्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या नऊ कर्तृत्ववान व्यावसायिक महिलांचा जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने"नवदुर्गा सन्मानपत्र"प्रदान करुन सत्कार करण्यात आला.सर्व प्रथम दि लिटील एंजल्स ट्रेनिंग प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका सौ.सुमन चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले.शिवदुर्गा अपार्टमेंट,ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावर,बदलापूर(पूर्व)येथील कार्यालयात हा जनजागृती सेवा संस्थेचा"नवदुर्गा सन्मानपत्र"प्रदान सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी वैभवी पाटेकर,संगिता विचारे,जयश्री मिनमिणे,सुप्रिया गवळी,प्रितम बटवाल,ज्योत्स्ना मिसाळ,अंकिता ठाकर,भागश्री राठोड या शैक्षणिक क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यावसायिक महिलांना जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर व दि लिटील एंजल्स प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका सौ.सुमन चव्हाण यांच्या हस्ते आकर्षक"नवदुर्गा सन्मानपत्र व संस्थेचा अहवाल प्रदान करुन गौरविण्यात आले.तसेच दि लिटील एंजल्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ.सुमन चव्हाण यांनाही नवदुर्गा सन्मानपत्र व संस्थेचे आभार पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.शेवटी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी सर्वांचे आभार मानले.