महागाव शहरांमध्ये दसरा हा सण अतिशय उत्साहात व आनंदात पार पडला
प्रतिनीधी । महागाव
महागांव : शहरामध्ये परंपरेनुसार दसरा साजरा करण्याची प्रथा पूर्वांपार सुरू आहे. शनिवारी (ता. १२) दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी पारंपरिक वाद्यांच्या गजरात हनुमान मंदिरापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर असलेल्या आपट्याच्या झाडापर्यंत वाजत - गाजत मिरवणूक काढली. श्री हनुमान मंदिर व राम मंदिर येथून पूजा आरती करून मानकरी व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मशाल व पारंपारीक वाद्य श्रीराम चौक मार्गे गणपती चौक, बिरसा मुंडा चौक, छत्रपती चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे रमेश पाटील यांच्या घराजवळ घेऊन दसऱ्यानिमित्त
सीमोल्लंघन परंपरेनुसार आपट्याचे व शमीचे झाड पान आणून त्यात आपट्याच्या झाडाचे विधिवत पूजन व आरती करून मानकरी यांच्या तलवारीने आपट्याचे पाणी तोडून सर्व गावकरी मंडळी यांना वाटप करण्यात येतो आपट्याचे झाड ही रमेश पाटील यांच्या घराजवळ आहे.
परत मानकरी व सर्व गावातील नागरिक श्री हनुमान मंदिराजवळ एकत्र येतात व सर्वांना प्रेमाने आदराने आपट्याचे पाणी देऊन सर्वांचा आशीर्वाद घेतात. महागावांत दसरा उत्सव परंपरेनुसार साजरा करण्याची प्रथा आजही सुरू आहे.
ठरलेल्या ठिकाणावरुन वाजत - गाजत मिरवणूक काढण्यात आली. मानकर्यांच्या हस्ते आपट्याच्या झाडाची विधिवत पद्धतीने पूजा केली. त्यानंतर आपट्याच्या झाडाचे एक पान मानकर्यांकडुन काढण्यात आले व सोने लुटण्यास प्रारंभ केला. त्यानंतर उपस्थित गावातील नागरीकांनी झाडाच्या फांद्या तोडून सोनं लुटण्याचा आनंद घेतला. आपट्याच्या पानांची देवाण - घेवाण म्हणजेच परंपरेनुसार सोनं लुटण्याची प्रथा पार पडली.