शिराळा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण संपर्क अभियान संपन्न

 



  शिराळा :- येथील शिवसेनेचे अमरावती तालुकाप्रमुख मंगेश काळमेघ यांनी आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संपर्क अभियान व महिला मेळावा ३ आक्टोबर ला कार्यक्रम सोहळ्याला महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसाद....                       

महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निर्देशानुसार राज्यातील प्रत्येक तालुका व गाव पातळीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपर्क अभियान राबविण्यात येत आहे . अशातच शिराळा येथील शिवसेनेचे अमरावती तालुका प्रमुख मंगेश काळमेघ यांच्या मार्गदर्शनात शिराळा येथील सहभागृहामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संपर्क अभियानाचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात गुरुवार दिनांक 3 आक्टोबर ला पार पडला.



     या कार्यक्रमाला जास्ती जास्त प्रमाणात महिला वर्गांनी आपली उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा अमरावती तालुकाप्रमुख मंगेश काळमेघ हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात आज पर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, शासकीय योजना बद्दल माहिती करता शिबिरे आयोजित केले अशी त्यांच्या कार्याची ओळख आहे. 

    रुग्णसेवक समाजसेवक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपर्क अभियान कार्यक्रमांमध्ये ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नसेल त्यांना येत असलेल्या समस्या व त्यावरील उपाय योजना यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले मंगेश काळमेघ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे सदस्य असल्यामुळे अनेक महिलांनी त्यांच्या समस्या सांगून व योजनेला लागणारी आवश्यक कागदपत्रे मंगेश काळमेघ यांच्या जवळ जमा केलीत   या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या पश्चिम विदर्भ समन्वयक ॲड. संगीता चव्हाण शिवसेना महिला संपर्कप्रमुख बीड व धाराशिव तथा महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य यांची विशेष उपस्थिती होती.

    त्याचप्रमाणे रेखा खारोडे जिल्हाप्रमुख शिवसेना या उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रतिभा बुक्कावार प्रदेश समन्वयक , उद्योग सहकार सेना महासंघ, प्रिती साहू कु. जयश्री चांडक, डॉ. राजेश बुक्कावार, सारिका जयस्वाल,  वंदना दारवेकर , संगिता गावंडे, वृंदा मुक्तेवार संगिता बांबल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महिलांना कशा प्रमाणे रोजगार उपलब्ध होईल यासंदर्भात प्रदेश समन्वयक प्रतिभा बुक्कावार यांनी विशेष मार्गदर्शन केले व प्रिती साहू यांनी पण महिलांना मार्गदर्शन केले. 

   त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख पूजा रिठे तालुकाप्रमुख सुनिता आखरे रूपाली हटवार वैभवी राऊत, आरती शर्मा , भावना काळमेघ , शुभांगी मानकर वैशाली कुकडे, नैना देशमुख, वर्षा  देशमुख, इत्यादी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

    त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मंगेश काळमेघ यांचा मित्रपरिवार व शिवसेनेचे सदस्य आकाश शर्मा महाराज फाउंडेशन चे सचिव, निलेश कुकडे राजेश कुकडे,,रितेश देशमुख, स्वराज मानकर ,पवन पाटणकर ,आकाश शेंडे ,साहिल राणे, स्वप्निल देशमुख , सागर रोडे ,अभिषेक घुरडे, संकेत जिभकाटे, प्रेम जिपकाटे , सतीश पटले ,विक्रांत मिसार ,निलेश रिठे, गौरव नागपुरे ,अनुष्का बांबल ,सानिका कोल्हे व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    त्याचप्रमाणे प्रत्येक महिलेला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांचा सत्कार समारंभ प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन करण्यात आला या कार्यक्रमाचे मुख्य संचालन साधना पाटणकर यांनी उत्कृष्ट प्रकारे पार पाडले व आभार प्रदर्शन निलेश रिठे यांनी केले अशा प्रकारे भव्य दिव्य स्वरूपात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संपर्क अभियानाचा कार्यक्रम पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post