ओबीसी समाज संवाद सभा...
अमरावती : तीर्थक्षेत्र चांगापूर, : जातनिहाय जनगणना करण्यासाठी सर्व ओबीसी समाजाला सरकारला झुकवण्यासाठी दबाव गट निर्माण करण्याची गरज तसेच केंद्र व राज्य सरकारला ओबीसी समाजाच्या हितासाठी 52 निर्णय घ्यायला भाग पाडणे हीच खरी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलन आंदोलनाची ताकद =राष्ट्रीय सरचिटणीस सचिन राजूरकर यांचे प्रतिपादन.
जेवणाच्या पंगतीतला वाढपी आपल्या हक्काचा असावा, ही भावना ओबीसी समाजामध्ये निर्माण करण्याची खरी गरज - पौर्णिमाताई सवाई.
पश्चिम विदर्भातील ओबीसी समाजाला आपले हक्क व अधिकार समजण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ओबीसी समाज संवाद सभा व जनजागरण अभियान क्रांती घडवेल - राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश साबळे यांचे मनोगत.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जनजागरण अभियानाच्या क्रांतीज्योती( मशाल) चे स्वागत ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आले.
मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये, यासाठी सतत 21 दिवस उपोषण करून राज्य सरकार व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नमवून व लेखी लिहून घेणारे ओबीसी योद्धा व शेतकरी पुत्र रविंद्र टोंगे यांचा भावपूर्ण सत्कार प्रकाश साबळे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने दिनांक 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत ओबीसी समाज संवाद सभा व जनजागरण अभियान च्या अनुषंगाने तीर्थक्षेत्र चांगापुर जिल्हा अमरावती येथे दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी ओबीसी समाज सभेचे भव्य आयोजन करण्यात आले.
संवाद सभेचे उद्घाटक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन राजूरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य पौर्णिमा ताई सवाई,प्रमुख मान्यवर व आयोजक प्रकाश साबळे, राष्ट्रीय प्रवक्ते ऋषभ राऊत, विदर्भ प्रदेश अध्यक्ष राजू चौधरी, ओबीसी योद्धा रविंद्र टोंगे, राज्य उपाध्यक्ष अनंतराव भारसाकळे, रमेश राव वानखडे,विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण वानखडे, महिला आघाडीच्या अमरावती जिल्हाध्यक्ष सुषमा साबळे, ओबीसी कर्मचारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास बाबरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या युवा आघाडीचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष विशाल केचे, प्राध्यापक ज्योती यावलीकर, मुकुंदराव उभाळ, उमेश साबळे, शेखर अवघड, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
अमरावती जिल्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा व तालुका स्तरावरील विविध सेलच्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्या. सभेचे सूत्रसंचालन सोमेश गावंडे व आभार प्रदर्शन राष्ट्रीय समन्वयक राहुल तायडे यांनी केले.
Tag : #ओबीसीसमाज #गावाकडचीबातमी #अमरावती #मराठीबातमी #शेतकरी #प्रकाश_साबळे #ओबीसीमहासंघ #GavakadachiBatmi