भिमक्रांती सामाजीक संघटना,महा.राज्य संघटनेची आढावा बैठक व नियुक्ती समारंभ संपन्न!





संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटनिस मा.संजयभाऊ डोंगरे साहेब व महाराष्ट्र प्रदेश कार्य.सदस्य मा.अशोकराव इंगोले यांची प्रमुख उपस्थीती व प्रथम आगमना निमित्त जंगी स्वागत-सत्कार!




सुप्रसिद्ध समाजसेवक अनिल फुलझेले यांचा वाढदिवसाच्या निमीत्ताने सत्कार- लवकरच भिमक्रांती संघटनेत करणार जाहीर प्रवेश...


अमरावती, राजाभाऊ वानखडे : रविवार दिनांक 6 ऑक्टोंबर 2024 रोजी भिमक्रांती सामाजीक संघटना,महा.राज्य संघटनेची महत्वाची आढावा बैठक घेण्यात आली,सदर बैठकिला प्रामुख्याने भिमक्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सर‌चिटनिस मा.संजय डोंगरे  व मा.अशोकराव इंगोले साहेब यांची उपस्थिती होती.त्यांचे नियुक्ती नंतर प्रथमच अमरावती आगमन असल्यामुळे जंगी स्वागत-संस्कार करण्यात आला.सर्वांचा परिचय व त्यांचा कामाचा आढावा घेण्यात आला.विविध सामाजीक मुद्द्यांवर चर्चा करून महत्वाचे निर्णय घेण्यात आले.त्यामध्ये संत कबीर नगर वासीयांना माल‌मत्ता कर लावण्या बाबत कार्यवाही,संघटनेत कामगार,विद्यार्थी,युवा, महिला,कला व सांस्कृतिक कार्य अशा विविध विंग पदाधीकारी यांच्या नियुक्ती करने,संघटन वाढ‌विण्यासाठी नीधी उभा करने,सोबतच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक संदर्भ संदर्भातही विषय घेण्यात आला.गत काही सप्ताह पूर्वी बैठकीत प्रकाशभाऊ गवई यांचे नाव अमरावती विधानसभा निवडणूक साठी उमेदवार म्हणून घोषीत केले होते परंतु वारंवार निर्देशीत करूनही त्यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात प्रचार-प्रसार सुरू न केल्यामुळे त्यांचे नावाची उमेदवारी रद्द करण्यात आल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले व भिमक्रांती संघटनेचा सध्या कोणीही उमेदवार निवडणूक रिंगणात नाही असे संस्थापक अध्यक्ष गोपाल  ढेकेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.सोबतच कार्यकर्त्यांनी वैयक्तिक,सार्वजनिक, सामाजिक समस्या सोडवून आपल्या परिचीतांना संघटनेच्या कार्याची माहिती देऊन प्रचार-प्रसार करावा तसेच तन-मन-धनाने संघटन वाढविण्यास सहकार्य करावे असे आवाहन करण्यान आले.*

मा गोपाल ढेकेकर हे खरे स्वाभिमानी व कर्तव्यदक्ष नेतृत्व आम्हाला मिळाले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यांच्या नेतृत्वात भिमक्रांती संघटना संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात,गावागावात पोहोचवणार असा संकल्प आम्ही केलेला आहे,तन-मन-धनाने संघटन बांधणी साठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजयभाऊ डोंगरे साहेब यांनी केले. याप्रसंगी संघटनेचे अमरावती कामगार जिल्हाध्यक्ष सुमितभाऊ गणविर यांनी कामगार क्षेत्रातील समस्या मांडल्या सोबतच मा. कामगार* *उपायुक्त,कार्यालय अमरावती या ठिकाणी निवेदन व चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार अशी माहीती दिली.त्यानंतर कामगार पदाधीकारी यांची नियुक्ती करण्यात आली त्यामध्ये वसंत बाजीराव रेवस्कर यांची द‌र्यापूर कामगार तालुका अध्यक्ष,कु.कोमल विनोद भाकरे यांची अमरावती कामगार तालुका अध्यक्ष,प्रशांत हरिभाऊ बावने यांची वडनेरगंगाई कामगार ग्राम शाखा अध्यक्ष,काम‌गार सुनीलभाऊ गावंडे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. याप्रसंगी प्रसिद्ध समाजसेवक मा.अनिल फुलझेले यांचा वाढदिवसही साजरा साजरा करण्यात आला.सोबतच त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत-सत्कार करण्यात आला.

  याप्रसंगी सत्कारमूर्ती अनिल फुलझेले यांनी लवकरच भिमक्रांती सामाजीक संघटना मधे जाहीर प्रवेश करणार असल्याचे अभिवचन दिले.यांप्रसगी सूत्रसंचालन अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल बनसोड यांनी केले.आभार प्रदर्शन महिला शहराध्यक्ष सुनिताताई शिरसाठ यांनी केले.

या कार्यक्रमाला संजय डोंगरे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस,अशोकराव इंगोले महाराष्ट्र प्रदेश सदस्य,संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल ढेकेकर,सुनंदाताई गवई मॅडम महिला विदर्भ प्रदेशाध्यक्ष, सुनिता शिरसाट अमरावती महिला शहराध्यक्ष,सरिताताई खंडारे अमरावती महिला जिल्हाध्यक्ष,सागर मोहोड महाराष्ट्र प्रदेश कार्य.सदस्य,सुनीलभाऊ बनसोड अम.जिल्हा कार्याध्यक्ष,सुमित गणवीर अम.कामगार जिल्हा अध्यक्ष,वैष्णवी भोजने,अमरावती कामगार तालुका अध्यक्ष कु.कोमल भाकरे,परमानंद खिराळे,मंगलाताई वानखडे संत कबीर नगर शाखाध्यक्ष,कमलताई खंडारे,विजयाताई पिलावन अमरावती शहर उपाध्यक्ष,अरविंद नगराळे ज्येष्ठ मार्गदर्शक,वंश मते रहाटगाव शाखा अध्यक्ष,वसंत रेवसकर दर्यापूर तालुका कामगार अध्यक्ष,प्रशांत बावणे वडनेरगंगाई ग्राम शाखा कामगार अध्यक्ष,सुनील गावंडे,विठ्ठलरावजी तंतरपाडे,संजय शंकरपाळे ज्येष्ठ सल्लागार,लोककलावंत नंदकिशोर पाटील सर,भीमरावजी धंदर, अमरावती शहर सचिव राष्ट्रपाल घरडे, अमरावती शहर उपाध्यक्ष प्रदीप थोरात,अमरावती शहर कार्य.परमेश्वर भोयर,युवा उद्योजक आकाश वाहने,अमित शेंद्रे,अजय शेंडे यांची प्रामुख्याने उपस्थीती होती.

===============================



Post a Comment

Previous Post Next Post