दिनांक: ६/१०/२०२४ ला शे.घाट (मलकापूर ) येथे बालबच्चा दुर्गा मंडळ तर्फे रोगनिदान मार्गदर्शन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आध्यात्मा सोबतच सामाजिक जाणीव ठेवून समाजहित कसे घडेल हे ध्येय ध्यानीमनी ठेवून बालबच्चा दुर्गा मंडळाकडून उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रहार पक्षाचे संस्थापक आ.बच्चू कडू हे होते.
यावेळी प्रमाणे प्रमुख पाहुणे शे.घाट पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री दीपक महाडिक, माजी जि.प. सदस्य अनिल खांडेकर, डॉ.महेंद्र राऊत,अजय चौधरी डॉ. मनोहरजी आंडे,गजानन ब्राह्मणे, प्रभाकर काळे,हे मान्यवर उपस्थित होते.
तसेच मार्गदर्शक तज्ञ डॉक्टर डॉ. परीक्षित रामपुरे (नवजात शिशु व बालरोग तज्ञ),डॉ. रोशन सिंहमारे (स्त्रीरोग तज्ञ),डॉ. रणधीर घोरपडे (कान, नाक,घसा तज्ञ), डॉ. अरविंद बडघरे(त्वचारोग तज्ञ), डॉ. आनंद झांमडे व डॉ.सुमित घोडे(दंत व मुख रोग तज्ञ),डॉ. मानसी पाटील व डॉ.सागर वसुले(जनरल फिजिशियन) यांनी रुग्णांची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले.
त्या वेळी शे.घाट, मलकापूर व आजूबाजूच्या गावातील एकूण ६७५ नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला व एकून ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले व आयोजकांचे तसेच सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीरितेने करण्याकरिता मंडळातील व गावातील चेतन चापले, शालिक फरकसे,रोशन बालपांडे,राजु बांदरे,गजानन कपले,उमेश हजारे,सुधंशु जैस्वाल, विलास कपले,रमेश जोगेकर,पंकज वघाळे, मोहन बांदरे, गणेश कपले,अंकुश श्रीराव,पवन चापले, धिरज वाघमारे, गौरव चापले,भुषण पोटे,विक्की फरकसे, लखन वंजारी,प्रवीण बांदरे,,रोहित झोड,भारत झोड, हितेश चापले, राजकुमार पाटिल,निलेश पाटील, अक्षय सोनकुसरे,जय भुमरकर,संकेत कपले,शैलेश कपले, अभिषेक दवंडे, लकी दवंडे, आकाश बोथे, मंगेश बांदरे, हर्ष हेडाऊ, निश्चय बांदरे,
भुषण बालपांडे,कुणाल चापले, गणेश दवंडे, महेंद्र दवंडे, अतुल बांदरे,तेजस चापले, श्रेयस पोटे, यश पाटील, ओंकार बांदरे,कलश रेवतकर, रितेश बांदरे, रुद्राक्ष जोगेकार, रितिक बालपांडे सर्वांनी परिश्रम घेतले