चंद्रपूर/वरोरा : महिला बचत गट व वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा मध्ये मार्गदर्शन करताना वंदना बरडे अधिसेविका उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे
दिनांक ७ ऑगष्ट २०२४ ला नगर भवन वरोरा येथे मोठ्या प्रमाणात महिला मेळाव्याचे व वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सावित्री लोकसंचालित संसाधन केंद्र वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळाव्याला वंदना विनोद बरडे अधिसेविका व सामाजिक कार्यकर्त्या यांनी मार्गदर्शन केले.
सर्व प्रथम सावीत्रीबाई फुलें यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात केली.
मार्गदर्शनात त्यांनी महिला मेळाव्याच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
विशेष प्राविण्य मिळविले त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.मुलींनी छान नृत्य केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन कौतुक केले.
स्रीशक्तीचे महत्व समजावून सांगितले.स्त्रीयांनी नेहमी चांगल्या कामासाठी सकारात्मक असायलाच पाहिजे,सर्वांनी आरोग्यदायी जिवनशैलीत जिवन आनंदाने जगावे, आरोग्यदायी जिवन शैली कशी ते समजावून सांगितले.खानपान आहार विहार,आचार,विचार कसें सकारात्मक ठेवावेत योगा प्राणायाम मेडिटेशन याविषयी मार्गदर्शन केले.
मीठ,साखर,मैदा या वस्तूंचा वापर करू नये,फास्ट फुड घेवू नये.त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे समजावून सांगितले.दरवर्षी ६ महिन्यांतून आपल्या सर्व तपासण्या करून घ्याव्यात.
त्यात काही निघाले तर..औषधोपचार घ्यावे कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये व आत्महत्या करू नये.कुटुंबामध्ये सर्वांनी एकमेकांना साथ दिली पाहिजे.एकत्र कुटूंब पध्दतीचे फायदे समजावून सांगितले.पडित शेती भाडेतत्त्वावर घेऊन शेंद्रीय शेती करण्याचें आवाहन केले.आपण पैश्याची व आरोग्याची कशी बचत करू शकतो हे समजावून सांगितले.तेलकट , मसालेदार, व बाहेरील पदार्थ टाळावेत.त्याने काय नुकसान होते.
स्तनपान सप्ताहाचा आज शेवटचा दिवस. या १ऑगस्ट ते ७ ऑगस्ट मध्ये जागतिक स्तनपान सप्ताहाचे आयोजन उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे करण्यात आले होते.
स्तनपान करतानी आईने काय काळजी घ्यावी लागते हे समजावून सांगितले.
स्तनपान सप्ताहात कूटुंबाचा सहभाग किती महत्त्वाचा हे आहे. त्याचे फायदे समजावून सांगितले.बाळाचे लसीकरण विषयी मार्गदर्शन केले.आईच्या दुधाचे महत्व समजावून सांगितले.
त्याचे फायदे समजावून सांगितले.कॅन्सर , मधूमेह रक्तदाब याच्या उपचार पद्धती विषयी मार्गदर्शन केले.