भाजपामधून दिनकर सुंदरकर एकमेव इच्छुक उमेदवार
तिवसा / प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकिचे वारे वाहू लागले असून विविध पक्षाची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे मात्र संख्येने बहुतांश असलेल्या माळी समाजाला राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांनी विधानसभेचे प्रतिनिधित्व द्यावे याकरिता माळी समाज एकवटला आहे.
माळी समाजाचे असंख्य कार्यकर्ते आजपर्यंत केवळ इतर उमेदवारांकरिता काम करत होते मात्र हा समाज राजकारणापासून उपेक्षित असल्याचे बोलल्या जाते तर या विधानसभा निवडणूक दरम्यान राष्ट्रीय पक्षाने समाजातील योग्य कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये संधी द्यावी अशी चर्चा जोर धरत असून याबाबत अनेक खाजगी बैठकी सुद्धा झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे तर भुसावळ येथे संपन्न झालेल्या माळी समाजाच्या मेळाव्यामध्ये माळी समाज बहूल विधानसभा क्षेत्रात माळी समाजाचे उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर झाल्याने राजकारणाला वेगळीच दिशा प्राप्त झाली आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षात माळी समाजाचा दावेदार नसल्याने येथे उमेदवार असण्याची शक्यताच नसल्याने भाजपकडून उमेदवारी करिता माळी समाजाला खूप मोठी अपेक्षा लागली आहे. भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चा माजी जिल्हा सरचिटणीस दिनकर सुंदरकर यांच्या नावाची चर्चा माळी समाजातून होत असून एकमेव माळी समाजातील दावेदार असल्याने यांच्या नावावर समाज शिक्कामोर्तब करू शकतो जर असे झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील समाज हा वैचारिक पद्धतीने यावेळी निवडणूक आपली निर्णायक भूमिका घेणार आहे. मात्र माळी समाजाला अमरावती जिल्ह्यात तीवसा या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी माळी समाजाच्या नेत्यांच्या चर्चेतून दिसून आली तिवसा - वरुड मोर्शी - अचलपूर या मतदारसंघात माळी समाजाची मते निर्णायक असल्याने मतदारसंघात माळी समाजाला संधी मिळावी अशी मागणी जोरदार केली जात आहे. असे असताना ओबीसी चेहरा असलेल्या सामान्य निष्ठावान कार्यकर्त्याला जर संधी मिळाली तर नक्कीच विरोधी पक्षाला विरोधक म्हणून सक्षम उमेदवार मिळेल असे चर्चेला जात आहे. सामान्य कार्यकर्त्यांचा सामान्य चेहरा अशी दिनकर सुंदरकर यांची ओळख असून गेल्या अनेक वर्षापासून तिवसा विधानसभा क्षेत्रात सातत्याने प्रवास भेटीगाठी व अनेक योजनांच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत त्यांचा दांडगा संपर्क असून त्यांनाच उमेदवारी मिळावी याकरिता समाज बांधव सरसावले आहे मात्र असे न झाल्यास माळी समाजाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर येणारी निवडणूकित ओबीसी समाजाची भूमिका ही परंपरागत नेतृत्वाच्या व थोपलेल्या उमेदवारांच्या विरोधात नक्कीच असेल अशी चर्चा विधानसभा क्षेत्रात सुरु आहे.