घनसावंगी अंबड आयुष्यमान व्हा आयुष्यमान भारत ई-कार्ड काढा

 


पाच लाखांपर्यंत उपचार मोफत : राज्यातील एक हजार रुग्णालयांत सुविधा


जालना अनेक रुग्णालयांत




 उपचारासाठी विशेषतः गंभीर आजाराच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो. अनेकदा हा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे पैसे जमवताना त्यांच्या कुटुंबाला तारेवरची कसरत करावी लागते. प्रसंगी कर्जही काढावे लागते. मात्र जर रुग्णाकडे आयुष्यमान भारत ई- कार्ड असेल तर त्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार जालना 22 रुग्णालयांत या योजनेद्वारे मोफत मिळतात. त्यामुळे सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अंबड घनसावंगी करानी आपल्या आरोग्याबद्दल जागरूक राहून आयुष्यमान भारत ई-कार्ड काढणे गरजेचे आहे.





'आयुष्मान भारत' ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी


योजना आहे. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार व उत्तम आरोग्य सुविधा पोहोचविणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. केंद्र शासन 'आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना' राबवत आहे. २०१८ मध्ये ही योजना सुरू झाली असून, कार्डधारकाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. या योजनेमध्ये एक हजार ३५६ आजारांचा समावेश करण्यात आला आहे. यात अनेक गंभीर आजारांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुरुवातीला पिवळ्या रेशन कार्डधारकांना या योजनेत समाविष्ट केले होते. आता केसरी व पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे


40 टक्के अंबड घनसावंगी कार्ड


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार डॉ ओमप्रकाश शेटे साहेब आयुष्मान भारत सरकार समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब श्री सतीश घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात २ नोव्हेंबर २०२३


रोजी 'आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र' नावाची समिती नेमण्यात आली आहे योजना जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यमान भारत कार्डाचा उपयोग रुग्णांना हॉस्पिटलमध्ये एटीएम कार्डप्रमाणे 'हेल्थ कार्ड' म्हणून व्हावा, अशी संकल्पना आहे.


 सुदर्शन राऊत आयुष्यमान भारत समिती घनसावंगी तालुका अध्यक्ष

अंबड घनसावंगी तालुक्यात 18.0000 राहिली 64.770 लाभार्थी असून आतापर्यंत म्हणजे 36 टक्के आयुष्यमान भारत ई- कार्ड वितरित करण्यात आली आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post