मानवाधिकार आयोगाच्या अधिकारी सांगून तब्बल 15 लाखांची फसवणूक...



कोणी जर आपल्याला राज्य मानवाधिकार तसेच आंतरराष्ट्रीय मावधिकार सांगत असेल तर सावध व्हा..



असे आवाहन अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे..

  चांदूर रेल्वे येथील एका व्यक्तीची आंतरराष्ट्रीय मावधिकार आयोगाच्या दिल्ली वाले अधिकारी यांना पैसे पाठवायचे आहे..

त्यांची फसवणूक 15 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय मावधिकार आयोगाच्या अधिकाऱ्यांना पैसे पाठवायचे आहे. अशी खोटी बतावणी करून चांदूर रेल्वे येथील शेतकरी फिर्यादी संजय नंनोरे यांची तब्बल 15 लाखांची फसवणूक झाली.

अशी घटना उघडकीस आली आहे. फिर्यादीने सोलर प्रोजेक्ट उभारला त्यात कंपनी कडून मोबदला मिळवण्याची फिर्यादी संजय नंनोरे आणि कंपनी सोबत वाद निर्माण झाला असताच फिर्यादीची अनिल बन्सीलाल राठोड, संदिप दादाराव राठोड,यांची भेट झाली. त्यांनी फिर्यादीची ओळख आंतरराष्ट्रीय मावधिकार आयोग अधिकारी म्हणून करुन दिली.

    त्यांना कंपनीकडून मोबदला काढून देण्यासाठी कंपनी सोबत लढणे शक्य होणार नाही म्हणून खोटी माहिती देऊन फिर्यादीला 7 लाख रुपये किंमतीची शेती विकण्यास भाग पाडले. तसेच आंतरराष्ट्रीय मावधिकार परिषद दिल्लीच्या साहेबाला पैसे पाठवावे लागते असे म्हणून फिर्यादीची तब्बल 15 लाखांनी फसवणूक केली. 

    आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने गावाकडची बातमी टीमला व्यथा मांडली व गावाकडची बातमी टीम फिर्यादी संजय नंनोरे यांना घेऊन चांदूर रेल्वे पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.

    यावरून चांदूर रेल्वे पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले.


आपल्याला जर कोणी राज्य मानवाधिकार सह आंतरराष्ट्रीय मावधिकार दिल्लीचा पदाधिकारी असल्याचा खोटी बतावणी करीत असेल याबाबत ओळखपत्र दाखवून आयोगाचे प्रमाणात दाखवत असेल तर पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणतेही व्यवहार करू नका अन्यथा आपली फसवणूक होऊन आपल्या कडून खंडणी वसूल केल्या जाऊ शकते असे आवाहन अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात आली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post