मूर्तिजापूर - आदिमाया नारीशक्ती आदिवासी पारधी टाकणकर महिला मंडळाच्या वतिने येथील तिडके नगरातील श्रीराम मंदिरात आयोजित समाज जोडो महिला मेळावा व मोफत आरोग्य तपासणी शिबीरात ५० महिलांची तपासणी करण्यात आली.
आदिमाया नारीशक्ती आदिवासी पारधी टाकणकर महिला मंडळ महाराष्ट्र राज्याध्यक्ष सुनिताताई सोळंके यांनी शिबीराचे उद्घाटन केले. मालिनी सोळंके यांच्या स्वागत गितानंतर लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय आधिकारी डॉ. कल्पनाताई गावंडे व त्यांच्या चमुने थायरॉईड, एचबी, एचआयव्ही, व्हाईट डिस्चार्ज, रक्तगट, सिकलीग तपासण्या केल्या. प्रास्ताविक शोभाताई मालवे यांनी केले. भगवान राणे यांनी बासरी वादन केले. मंगलसिंग सोनाजी डाबेराव यांनी संस्कृती विषयी मार्गदर्शन केले. ॲडा.निलेश सुसतकर यांनी कायद्याविषयी मार्गदर्शन केले. देवेंद्र मालवे यांनी 'बचत गट' विषयी मार्गदर्शन केले.
विखुरलेला समाज एकत्रित आणण्यासाठी महिला समाज जोडो अभियान राबविणे, बोली भाषा पुनर्जीवित करणे, रीतिरिवाज व देवी पुजा संस्कृतीचे जतन करणे समाजातील मागासलेपणा व समस्या शिक्षण व नोकरी आणि व्यवसाय,विवाह जुळणे व घटस्पोट अश्या विविध संदर्भात सुनिताताई सोळंके यांनी मार्गदर्शन केले.
प्रदुषणमुक्तीसाठी प्रत्येक उपक्रमाच्या वेळी वृक्षारोपण करण्याचा प्रघात याही कार्यक्रमात कायम ठेवण्यात येऊन यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन शारदा डाबेराव यांनी केले. शालिनी सोळंके यांनी आभार मानले.
मंडळ अधिकारी सुनिल डाबेराव, देवेंद्र सोळंके यांनी परीश्रम घेतले. समाजातील बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.