दिनांक ३१ मे २०२४ ला उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक, वंदना विनोद बरडे अधिसेविका, डॉ दांरुडे वैद्यकीय अधिकारी डॉ केशवानी वैद्यकीय अधिकारी दंततज्ञ, उपस्थित होते.दिपप्रज्वलन करून अहील्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रास्तावीक वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी केले. त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला.स्रियांनी त्यांचें आदर्श घेऊन आपल्या जीवनात बदल घडवून सामाजिक दायित्व निभवावे.तसेच तंबाखू विरोधी दिवसाच्या कार्यक्रमाची संकल्पना समजून सांगितलि.सोबतच अवयव दान नेत्र दान देह दान रक्त दान करण्याचें आवाहन केले.
डाॅ दांरूडे यांनी तंबाखू खाण्याचे तोटे समजावून सांगितले.डाॅ केशवानी यांनी दातांची काय काळजी घ्यावी लागते या विषयावर मार्गदर्शन केले.व डॉ केशवानी यांनी तंबाखू विरोधी दिवसाची शपथ दिली.डाॅ खूजे वैद्यकीय अधीक्षक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना आदर्शांना जगासमोर आणुन त्याचा आपल्या जीवनात वापर केला पाहिजे.तसेच तंबाखू विषयी मार्गदर्शन केले.सुत्र संचालन नेहा ईंदूरकर एनसिडी कौन्सिलर व आभारप्रदर्शन किरणं धांडे अधिपरिचारीका यांनी केले.कार्यक्रमासाठी डॉ राठोड भुलतज्ञ, डॉ . पवार वैद्यकीय अधिकारी, शिवानंद पाटील,महेंद्र कांबळे क्षकिरण आपरेटर, ओमकार मडावी,बंडू पेटकर रिना,व्रुशाली दहेकर अप.तणिष्का खडसाने यांनी केले.विषेश सहकार्य डॉ खूजे, वंदना बरडे, सतिश येडे,पवन पंडित, अश्विनी बांगडे अप यांचें लाभले व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.