बदलापूर (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
बदलापूर: उद्योग ऊर्जा या बिझनेस नेट वर्किंग संस्थेची बदलापूर येथील पहिली कॉर्पोरेट बिझनेस मीटिंग शनिवार दिनांक 1 जून रोजी रोजी बदलापूर पश्चिम येथील AB'S Forest Zone च्या उत्सव सभागृहात अतिशय उत्साही आणि श्रीमंत वातावरणात संपन्न झाली. या वेळी विविध क्षेत्रातील ३०+ MSME व्यावसायिक उपस्थित होते. एकंदरच, पॉकेट ते कॉर्पोरेट अशी उत्तुंग यशाची भरारी घेणारी व्यावसायिकांची ही वारी असा अनुभव देणारे असे हे वातावरण होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्या सावंत यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यांनी सर्व उपस्थित व्यावसायिकांचे स्वागत केले आणि संस्थेची थोडक्यात ओळख करून दिली. सर्व व्यावसायिकांनी देखील आपला परिचय (Elevator Speech) प्रत्येकी १ मिनिटांत दिला. यामध्ये सर्वात प्रभावी परिचय देणाऱ्या चेतन देवधर यांना प्रशास्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
त्यांनंतर मकरंद पाटील (नेचरगुड-लाकडी तेल घाणा) व मालीनी शहा (फिटनेस कोच) यांनी अतिशय उत्तम पद्धतीने आपली बिझनेस प्रेझेंटेशन्स सादर केली. उपस्थित उद्योजकांना संबोधित करताना संस्थेचे सल्लागार समिति सदस्य ध्रुव अकॅडमी संचालक महेश सावंत ह्यांनी "पॉवर ऑफ नेटवर्किंग" या विषयांवर अतिशय सहज सुंदर शैलीमध्ये मार्गदर्शन केले. Contact ते Connect असे जोड निर्माण करणारे प्रेरणादायी शब्द व्यवसायिक नेटवर्किंगची ताकद पटवून देत होते. उद्योगऊर्जाची ओळख एक वेगळेच प्रोत्साहन देणारी, व्यवसायिक शिक्षण देणारी आणि अनुभवी मार्गदर्शन देणारी व भविष्यातील आदर्श व्यवसायिक नेतृत्व निर्माण करणारी एकमेव संस्था अशी होत आहे.
जिथे फक्त एकमेकांचा व्यवसाय वाढत नाही तर त्या व्यवसायातून व्यवसायिक नात्यांचा बाँड घट्ट होत जातो आणि मग त्यातूनच 8.5 कोटींची आश्चर्यकारक उलाढाल होते. अनेक उदाहरणे आणि अनुभव यांच्या सहाय्याने त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणाने उपस्थित व्यावसायिकांना एकाचवेळी प्रेरणा (Motivation) आणि शिक्षण (Education) दिले.
उद्योगऊर्जा म्हणजे नक्की काय आहे? संस्थेचे पेड सभासद का व्हावे? त्याचे फायदे काय आहेत..? हे संस्थेचे सह-संस्थापक ब्रॅंडबॉण्ड निलेश B+ ह्यांनी खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले आणि उपस्थिती उद्योजकांच्या मनात सुवर्णपान निर्माण केले. उद्योगऊर्जा मधील सर्वच कार्यतत्पर, सकारात्मक उर्जादायी सभासदांसाठी आणि अश्याच अनेक व्यावसायिकांसाठी वार्षिक सभासदत्व घेण्याची सोन्यासारखी संधी त्यांनी सर्वसमोर अतिशय आत्मविश्वासाने सादर केली. ह्यात प्रत्येकाने आपले नाव सोनेरी अक्षराने कोरून ठेवावे कारण त्यात व्यावसायिकांना अनेक फायदे व अनेक गोष्टींचे नव्याने ज्ञान आणि आकलन होणार आहे ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय एका नवीन यशाच्या उत्तुंग शिखरावर नेता येणार आहे. आपल्या ओघवत्या वाणीतून कात टाकणारी उद्योगऊर्जा सरांनी समजावली. बदलत्या धारेत आपण नेहमीच असायला हवे. नवीन कल्पना स्विकारायलाच हव्यात. आत्मनिर्भर भारत बनवण्यामध्ये लहानमोठ्या व्यवसायिकांचा खुप मोठा वाटा आहे. देश बदलतोच आहे. आपण बदलायला हवे… नवे बदल स्विकारायला हवे… कारण जेव्हा समाज मोठा होतो, तेव्हाच राष्ट्र मोठे होते. त्या फळीत आपण आहोत.. खुप सजग आणि सक्रिय राहायला हवं असं ते म्हणाले. या कॉर्पोरेट मिटिंगच्या शेवटी उत्स्फूर्त फिडबॅक आले. शेवटी संस्थेच्या सल्लागार समिति सदस्य पूजा इंदुलकर अतिशय उत्तम पद्धतीने आपले विचार मांडून कार्यक्रमाचा समारोप केला. त्यानंतर स्नॅक्स आणि थंड सरबत अशी झकास व्यवस्था होती.
उद्योगऊर्जा हा जात धर्म पंथ प्रांत भाषा ह्याचे कुठलेही लेबल नसलेला एकमेव आघाडीचा व्यावसायिक मंच आहे. आणि खालील जबरदस्त घोषवाक्ये या संस्थेशी संबंधित आहेत.
ऊर्जा महाराष्ट्र, गर्जा महाराष्ट्र..!!
एक उद्योजक, कोटी उद्योजक..!!
हर एक उद्योजक, कोट्यधीश उद्योजक..!!
चला भेटुया, परस्परांना ऊर्जा देऊया..!!
ही कॉर्पोरेट मिटिंग यशस्वी करण्यासाठी महेश सावंत, पूजा इंदुलकर, दीपक राणे, आनंद तेंडुलकर, विद्या सावंत, मकरंद पाटील, मालिनी शहा, आसावरी नगरदेवळेकर, शमिका मूणगेकर यांचे सहकार्य लाभले. आपणही लहान-मध्यम व्यावसायिक, उद्योजक असाल तर संस्थेचे सभासद होऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क - उद्योगऊर्जा ९२२४४५३६७७