मोर्शी-नेरपिंगळाई : प्रतिनिधी प्रमोद घाटे - मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे दिनांक ७/६/२०२४ ला वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात नागरीकांनचे नुकसान झाले आहे त्यामध्ये नेरपिंगळाई येथिल शरद जोगदंड वार्ड क्रं सहा या मजूराच्या घरावरील संपूर्ण बारा ते पंधरा टिन पत्रे उडून गेले व घराचे सुध्दा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तरी शासनाने नुकसान ग्रस्त भागातील पंचनामे करायला सूरवात केली आहे तसेच महसूल विभागाने व इतर सर्व समंधित प्रशासनाने नुकसानग्रस्त नागरीकांना मदत करावी असे नागरीकांचे म्हनने आहे.