चंद्रपूर:- रंजन सामाजिक मंच चंद्रपूर तर्फे तुलसी कृष्णा कोटे वेंडली या विद्यार्थिनीचा अभिनंदन सोहळा वेंडली येथे पार पाडण्यात आला. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय वेंडली या शाळेची विद्यार्थिनी तुलसी कृष्णा कोटे हिला दहावीत 92.60% मार्क मिळवून केंद्र पिंपरी येथून पहिली मेरिट आलेली आहे. घरची परिस्थिती एकदम हलाखीची आई वडील शेतमजूर आहे व तुलसी पण आई-वडिलांना शेतीचे कामे करून थोडेफार हातभार लावायची घरची परिस्थिती अगदी जेमतेम असल्यामुळे शिकवणी वर्ग सुद्धा लावता आला नाही. अशाही परिस्थितीत 92.60% मार्क मिळविले. तिने आपल्या मनोगत म्हटले की मला डॉक्टर व्हायची इच्छा आहे.
परंतु परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे मला महागडे शिक्षण घेता येईल की नाही याची चिंता पण तिने बोलून दाखविले.तेंव्हा शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत पिंपळशेंडे म्हणाले तुलसी अतिशय हुशार व चाणक्ष विद्यार्थिनी आहे तिला जिद्द व परिश्रम करण्याची ऊर्जा आहे. ती डॉक्टर व्हावे असा आमचा मानस आहे तिच्या यशस्वी ते करिता आमच्याकडून होईल ते संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला रंजन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सचिन बरबटकर, सुदर्शन नैताम, बबन धनेवार,बापूजी कोटे, मोहन जिवतोडे, नितीन चांदेकर, गौरव अक्केवार, पांडुरंग कोटे उपस्थित होते. संचालन व मार्गदर्शन सुदर्शन नैताम सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन बरबटकर यांनी केले.