"महिलांची पिळवणूक"
आष्टी तालुक्यातील प्रकार
ग्रामीण कोटा फाईनन्सच्या प्रतिनिधीने निखिल याने केले आत्महत्येस महिलेच्या पतीला प्रवृत्त
वर्धा/आष्टी (शहीद) : पुष्पा बालपांडे या महिलेने ग्रामीण कोटा फाईनन्स कंपनी कडून कर्ज घेतले होते
आणि ग्रामीण कोटा कंपनीला कर्ज भरणा हप्ते नियमित प्रमाणे वेळेवर हप्ते भरणा करित होत्या.
परंतु महिलेचे पती सुरेश बालपांडे यांचा अपघात झाल्यामुळे पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्वरित आपरेशन करण्यासाठी सांगितले..
महिला पतीच्या आपरेशन साठी इकडून तिकडे पैसे साठी प्रयत्न करित आहे.
परंतु अशा परिस्थिती मध्ये महिलेला सवलत न देता ग्रामीण कोटा फाईनस कंपनीच्या प्रतिनिधींनीकडून महिलांच्या घरी ऐऊन लोकांचा जमाव करून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्यामुळे महिलेच्या पतीने (सुरेश बालपांडे) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
परंतु काही शेजारी असलेल्या लोकांनी धावपड केल्याने जीव वाचविण्याच्या प्रयत्न केला.
पतीच्या जीवाला काही बरेवाईट झाले.
तर याला जबाबदार ग्रामीण कोटा फाईनन्स कंपनीचे प्रतिनिधी राहतील अशी तक्रार महिलेकडून पोलीस स्टेशन येथे देण्यात आली..