श्रीकांत राठोड यांची एशियन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप हॉंगकॉंग चीन साठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड

 



उदगीर : अतिदुर्गम व डोंगर दरीमध्ये शहरापासून पासून जवळच वसलेल्या अतिदुर्गम बोरतांळातांडा (नागलगाव) तांड्यावर राहणाऱ्या एका नवतरुण युवकाची दि.११ व १२ मे २०२४ रोजी हॉंगकॉंग, चीन देशात होणाऱ्या एशियन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप साठी भारतीय संघाचे प्रशिक्षक (कोच) म्हणून निवड झाली आहे.

श्रीकांत देविदास बोरतळातांडा (नागलगाव) ता.उदगीर, जि.लातूर येथील असून ते लातूर जिल्हा व उदगीर तालुक्यातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामध्ये जे चांगली कामगिरी करतात. अशा विद्यार्थ्यांचे दरवर्षी त्यांच्या शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांचा व पुणे येथील प्रबोधिनीमार्फत परिपूर्ण असे प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील, देश-विदेशात सोबत संघ घेऊन व त्याचे भारतीय प्रशिक्षक कोच म्हणून सहभागी होत असतात. श्रीकांत देविदास राठोड यांचे सर्व शिक्षण क्रीडा प्रबोधिनी पुणे बालेवाडी स्टेडियम येथे झाले आहे. व ते त्यांनी जिम्नॅस्टिक याचे प्रशिक्षण घेतले आहे. पुणे स्थित जिम्नॅस्टिक या खेळाची अकॅडमी सुरू केली आहे. आणि त्या अकॅडमी मधून श्रीकांत राठोड यांचा विद्यार्थी नकुल कारेकर यांची पण निवड चायना येथे होणाऱ्या एशियन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप मध्ये निवड झाली आहे. आज दि.८ मे रोजी ते आपल्या संघाला घेऊन विमानाने रवाना झाली. एका तांड्यावरचा नवतरुण युवक बाहेरच्या देशात भारतीय प्रशिक्षक कोच म्हणून संघासोबत जातो ही भटक्या विमुक्त जाती जमातीतील बंजारा समाजाची शान असल्याचे सांगितले जाते. तसेच त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post