#गावाकडचीबातमी | गुरुकुल मध्ये सुसंस्कार शिबिराचे आयोजन, महाराष्ट्र व इतर राज्यातून 200 विध्यार्थी सहभागी

 



              प्रतिनिधी प्रमोद घाटे/प्रविण पाचघरे

                               

  तिवसा तालुक्यातील गुरुकंज मोझरी मध्ये दरवर्षी प्रमाणे उन्हाळ्यात सुट्टी मध्ये वयोगट दहा ते अठरा पर्यंतच्या विध्यार्थ्यांसाठी श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले.या संस्कार शिबिरामध्ये महाराष्ट्र,तेलंगणा व मध्यप्रदेश या राज्यामधून 200 विध्यार्थी सहभागी झाले आहेत.1 मे ते 15 मे दरम्यान चालणाऱ्या या सुसंस्कार शिबिरा मध्ये ध्यान-प्रार्थना,योग-प्राणायाम,भजन-संगीत, संत साहित्य,मार्शल आर्ट कराटे,लाठी-काठी, रोक-मल्लखांब व इतर मैदानी खेळ शिकविल्या जात आहे.राष्ट्रप्रेम, स्वावलंबन, व्यसन मुक्ती, व्यक्तिमत्व विकास असे विषय देखील तज्ञ कडून शिकविण्यात येत आहे.सदर शिबीर हे पूर्णतः लोकसहकार्याने चालत आहे. स्वयंप्रेरनेने गुरुदेव सेवा मंडळातील कार्यकर्ते एक वेळचे भोजनदान करीत आहे तर गावागावातून धान्य स्वरूपात सहकार्य पाठविल्या जात आहे.शिक्षक सेवा भावनेने काम करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post