अमरावती :- समाजसेवेत सदा अग्रेसर असलेल्या खाटीक समाज परिवर्तन संघटनेच्या महाजनपुरा येथील नवीन शाखेचे उदघाटन व फलक अनावरण संघटनेचे अध्यक्ष श्री नंदूभाऊ हरणे यांच्या हस्ते दिनांक ९/०५/२०२४ रोजी करण्यात आले. स्थानीक एकविरा सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात सदर शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष मोहन पारवे व उपाध्यक्ष देवेंद्र रावेकर तसेच इतर पदाधिकारी यांची निवड करून त्यांचा अध्यक्ष यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शहरातील महिला व पुरुष खाटीक समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.तसेच खाटीक समाज परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष,जेष्ठ सल्लागार,तसेच महिला अध्यक्ष,उपाध्यक्ष,कोषाध्यक्ष तसेच सर्व महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.