नेरपिंगळाई येथे श्री समर्थ गुलाबपुरी महाराज शताब्दी पुण्यतिथी महोत्सव

 




स्वच्छता अभियानाने होणार सुरुवात


 प्रतिनिधी/ प्रमोद घाटे मोर्शी  : तालुक्यातील नेरपिंगळाई येथे दि. 14 मार्च पासून श्री समर्थ गुलाबपुरी महाराज शताब्दी पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात होणार असल्यामुळे येणाऱ्या भाविक भक्तांना गावात येताना आल्हाददायक वाटावे या साठी दि ९/३/२०२४ ला ग्राम स्वच्छता अभियानाने कार्यक्रमाला सुरुवात होत आहे या स्वच्छता अभियाना मधे गावातील सर्व सेवेकरी नागरिकांनी या स्वच्छता अभियाना मधे सहभाग घेण्यासाठी सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजर रहावे येताना खराटा सोबत आणावा. स्वच्छता अभियाना चा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते लेहेगाव मार्ग ते इंडेन गॅस एजन्सी पर्यंत आयोजित करण्यात आला आहे त्याकरिता शनिवार 09/03/20२४ ला छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वांनी येतांना सोबत खराटा घेऊन यावे असे आवाहन श्री समर्थ गुलाबपुरी महाराज संस्थान च्या विश्वस्त मंडळाने गावकऱ्यांना केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post