नेरपिंळाई येथिल शिवभक्त विवेक बानाईत व मित्र परिवार यांचा उपक्रम. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा नेरपिंळाई येथिल शिवभक्त विवेक बानाईत कुटुंब व मित्र मंडळी परिवाच्या सहकार्याने नांदगाव पेठ येथुन ऐक ते दोन किलो मीटर तिवसा महामार्गावरील पुरातन संगमेश्वर महाकाल महादेव मंदिरात महाशिवरात्री ला महाकाल महादेवाच्या दर्शना करीता येणाऱ्या शिवभक्तांना साबुदाण्याची उसळ व मठ्ठा चे वाटप करण्यात आले यावेळी असंख्य भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला यावेळी नेरपिंगळाई मधिल शिवभक्त विवेक बानाईत, हिरालाल बानाईत, राहुल बानाईत, अमोल नवले, प्रमोद घाटे,राजू गायकी,संजय खंडारकर, प्रफुल्ल गायकी, बाबाराव इंगळे , बानाईत परिवार मित्र मंडळ, महिला भगीनी तसेच महिला पुरुष उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता साफसफाई करून करण्यात आली.