अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची मोर्शी तालुका कार्यकारिणी गठित

 



श्री क्षेत्र पिंगळादेवी गडावर झाली बैठक


प्रतिनिधी प्रमोद घाटे  : मोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र पिंगळादेवी गडावर नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी च्या बैठकीमध्ये मोर्शी तालुक्यातील कार्यकारिणी चे गठण करण्यात आले. 

या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनोहर सुने (केंद्रीय अध्यक्ष), युसुफ खान यासीन खान (कार्याध्यक्ष) अशोक पवार केंद्रीय सचिव, अशोक यावल कोषाध्यक्ष, प्रा. रविंद्र मेंढे संपर्कप्रमुख, बाळासाहेब सोरगिरकर, सदस्य, अंबादास सिनकर सदस्य, उमेश भुजाडणे जिल्हा अध्यक्ष, पिंगळादेवी संस्थान चे अध्यक्ष विनित पाखोडे, सचिव आषिश मारूळकर, कांचन मुरके,मालती सीनकर, वर्षा गाडगे,यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच महिला दिनाचे औचित्य साधुन कांचन मुरके,मालती सीनकर, वर्षा गाडगे तसेच जेष्ठ पत्रकार अजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला . 

मनोहर सुने यांनी पत्रकारांच्या समस्येवर चर्चा करून शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी पत्रकारांचे संघटन आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. यावेळी अशोक पवार, अशोक याऊल, प्रा. रविंद्र मेंढे कांचन मुरके यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास सिनकर यांनी केले आभार प्रदर्शन कैलास ठाकूर तर सुत्र संचालन राहुल मंगळे यांनी केले. 

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या मोर्शी तालुका कार्यकारिणीत कैलास ठाकूर अध्यक्ष ,अजय पाटील कार्याध्यक्ष, गजानन हिरुळकर उपाध्यक्ष, सचिन डबके उपाध्यक्ष, राहुल मंगळे सचिव, प्रमोद आमले सहसचिव, श्रीकांत सीनकर सहसचिव,विजय नालट संघटन सचिव, प्रकाश इंगळे संघटन सचिव, जितेंद्र फुटाणे संघटन सचिव, दिलीप भुंते संघटन सचिव, प्रकाश मेंढे संघटन सचिव,मालती सीनकर संघटन सचिव, प्रमोद घाटे संघटन सचिव, मंगेश वाघ संघटन सचिव, अनिल शिंदे संघटन सचिव, अनिल ठाकरे संघटन सचिव यांची नेमणूक करण्यात आली या वेळी मोर्शी तालुक्यातील पत्रकारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post