अजिंठा लेणीच्या पायथ्याशी फर्दापूर जवळ श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे

 



 जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख


सोयगाव तालुक्यातील फर्दापूरअजिंठा लेणी च्या पायथ्याशी फर्दापूर जवळ श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्या निमित्ताने ५.हजार नऊ शे ५० भाविकांनी उपासक दिक्षा देण्यात आली आहे.या दर्शन सोहळ्यासाठी राज्य भरातुन जवळपास ५० हजार भाविकांनी हजेरी लावली होती. 

श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिध्द पादुका नानिज पिठ येथुन आनुन फर्दापूर येथे पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याची सुरुवात सकाळी पासुन च  करण्यात आली होती.सकाळी लेझीम पथकासह शोभा यात्रा काढण्यात आली या मधे शिवाजी महाराज व गजानन महाराज यांच्या सह विविध धार्मिक देखावे साकारण्यात आले होते.दुपार नंतर पादुका दर्शन व पुजन करण्यात आले होते व नंतर पारायण व ग्रंथ वाचन करण्यात आले होते प्रवचनासाठी नानिज संस्थांना चे प्रवचन कार सोमदे सर यांना बोलावण्यात आले होते.या वेळी माऊली संप्रदाय च्या वतीने ४८ गरजुंना पिठ गिरणी चे वाटप करण्यात आले व या नियमिताने स्वस्व स्वरुप संप्रदाया ची ५ हजार नऊ शे ५० जनांना उपासक दिक्षा हि देण्यात आली आहे.

दिवस भर विविध पुजा व प्रवचन सुरू च होते या सोहळ्या निमित्ताने फर्दापूर सह परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते ह्या कार्यक्रमाचे अजिंठा लेणी जवळ जळगाव- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरभव्य प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.शिध्द पादुका दर्शन सोहळ्या सकाळी १० ते संध्याकाळी सात पर्यंत सुरू च होते. 

या पादुका दर्शन सोहळ्याला राज्य भरातुन जवळपास ५० हजार भाविकांनी हजेरी लावली होती यासह

 सोहळ्यासाठी.माजी.खासदार चंद्रकांत खैरे.माजि.आ.सांडु पाटिल लोखंडे.माजी.जि.प.अध्यक्ष रंगनाथ काळे.प्रभाकर पालोदकर.भा.ज.पा.प्रदेश सरचिटणीस सुरेश बनकर.ज्ञानेश्वर मोठे.शिव शेना तालुका प्रमुख दिलीप मचे.माजी चेअरमन राजेश काळे.यांची प्रमुख उपस्थितीत होती या सोहळ्यासाठी नानिज पिठा वरून उदय रानभरे व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यांच्यासह मराठवाडा पिठ प्रमुख गणेश मोरे.प्रोटोकाॉल अधिकारी विशाल रासकर.यांच्यासह जिल्हाचे पदाधिकारी उपस्थित होते.या सोहळ्यासाठी तालुका अध्यक्ष संतोष झोंड.सुभाष श्रीरंग काळे.दिपक नरोटे.

गणेश जाधव.सुभाष काळे.विनोद बलांडे अदिंनी परिश्रम घेतले होते.या वेळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

Previous Post Next Post