आमदार भांगडीयांची विशेष उपस्थिती : बँड पथक व लेझिम ची मेजवानी
चंद्रपूर / चिमूर, सुनिल कोसे: चिमूर तालुक्यातील नेरी येथे व्यापारी असोसिएशन यांचे तर्फे दिनाक 8 ला पारिवारिक स्नेह मिलन सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा करिता दिनांक 7 पासूनच जय्यत तयारी सुरू करण्यात आली. कार्यक्रमाचे दिवशी पाहुण्यांचे बँड पथक व लेझिम पतकानी स्वागत करून वाजत गाजत नूतन किराणा पासून तर कार्यक्रम स्थळी गुरूदेव सेवा मंडळ येथे नेण्यात आले.
या स्नेहमिलान कार्यक्रमाकरीता चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया हे उपस्थित होते त्याचसोबत जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद खत्री, कोषाध्यक्ष अनिल गुप्ता, सचिव मेहश डेंगाणी, तालुका व्यापारी महासंघ अध्यक्ष धनराज मुंगले, ग्रामपंचायत सरपंच सौ रेखा पिसे, चिमूर व्यापारी असोसएशनचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, बबन बंसोड, शाम बंग, तसेच चिमूर येथील व्यापारी व इतर नवरगाव, सींदेवाही येथील व्यापारी संघाचे पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमावेळी बंटी भांगडिया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र, नवनिर्वाचित तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश कामडी, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रवींद्र पंधरे, ग्रामपंचायत सदस्य निखिल पिसे, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी बबलू मोगरे यांचा नेरी व्यापारी असोसएशन तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार भांगडिया यांनी नेरी येथे 40 लाख रुपयाचे व्यापारी संकुल बांधून देण्यात येईल व नेरी phc चौक ते बाजार चौक पर्यंत नाली ते नाली सिमेंट काँक्रिट रोडचे बांधकाम करून देण्यात येईल तसेच व्यापारी वर्गाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहो असे आश्वासन यावेळी दिले.
कार्यक्रमाचे संचालन विलास पिसे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू पिसे यांनी केले. प्रास्ताविक मंगेश चांदेकर अध्यक्ष यांनी केले. यावेळी सुरेश पिसे, गुलाब कामडी, विलास चांदेकर, रवींद्र चुटे, चांदखा पठाण शैलेश शेन्मारे, विनोद कामडी, तथा शेकडो चे संख्येने व्यापारी व सदस्यगण उपस्थित होते. कार्यक्रम समाप्तीनंतर कार्यक्रमाची सांगता भोजनाच्या मेजवानीने करण्यात आली.