मूर्तिजापूर - सार्वजनिक धार्मिक सण-उत्सव साजरे करताना शहरवासीयांनी, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवावे, इतरांच्या भावना दुखवणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन ठाणेदार भाऊराव घुगे यांनी केले.
शहर पोलिस स्टेशन मध्ये घट स्थापनेच्या, नवरात्र ,नवदुर्गा महोत्सव पूर्वसंध्येला आयोजित शांतता समितीच्या सभेत बोलत होते. यावेळेस शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी सर्व देवी भक्तांना व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन वजा सूचना देताना सांगितले, की उत्सव हा आपल्यासाठीच असतो व तो खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करावा. मात्र उत्सव साजरा करताना कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे जेणेकरून युवा तरुणांवर कोणत्याच प्रकारचे गुन्हे दाखल करण्याची पाळी येणार नाहीं तसेच स्थापना व विसर्जन मिरवणुकीत काही अडचणी असल्यास पोलिस विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सभेला शांतता समिती सदस्य, पत्रकार व नवदुर्गा मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.