डॉ जी एस गजभे , काजल ननावरे सरपंच , मंगेश धाडसे उपसरपंच तथा कु उ बा स सभापती यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन संपन्न
चंद्रपूर/ चिमूर , सुनिल कोसे : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या खांबाडा येथे आ बंटी भांगडीया यांनी नवीन ग्रामपंचायत भवनासाठी निधी उपलब्ध करून देत जनसुविधा योजने अंतर्गत निधी उपलब्ध झाला दि 11 ऑक्टोबर ला या ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन कार्यक्रम डॉ जी एस गजभे, काजल ननावरे सरपंच , मंगेश धाडसे उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तपोभूमीला लागून असलेले खांबाडा हे मोठे गाव असून या गावात मागील 75 वर्षांपासून जुनी ग्रामपंचायत कार्यालय होते याच कार्यालयात आतापर्यंत कामकाज सुरू होता मात्र कामकाज करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे सभा घेण्यास व साहित्याची ठेवण करण्याची अडचण नेहमीच होत होती त्यामुळे ग्रामपंचायत समितीने ठराव घेऊन नवीन ग्रामपंचायत भवनासाठी या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटी भांगडीया यांना साकडे घालण्यात आले.
तात्काळ दखल घेत जनसुविधा योजने अंतर्गत वीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिला सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून तात्काळ कामाला सुरुवात होणार आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला रामभाऊ चौखे , सुनील कडवे, अमोल गजभे सर्व ग्रा प सद्स विनोद बारसागडे व्यवस्थापक संजय गायकवाड पो पाटील , उद्धव देवतळे, श्यामलता ननावरे ग्रा पं सदसा ग्रा पं कर्मचारी गावकरी पदाधिकारी उपस्थित होते..