छ. संभाजीनगर,जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत मोरे सह औरंगाबाद जिल्हा एल.सी.पी.पोलीस कृषी अधिकारी भोले या सर्व कर्मचार्याना सोबत घेऊन या शेतावर पोलीसांनी धाड टाकली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात दिनांक 11 आक्टोबंर बुधवारी रोजी मौजे टिटवी शिवारात कासार शिवडी नावाचे कांलकादेवी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गट क्रमांक 38 मध्ये स्वताहाच्चा कपाशी पिकांमध्ये गांजाची झाडे लावण्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानां व फरदापुर पोलीसांना मिळाली त्यानुसार त्यांनी कारवाई केले.
असुन संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. शेतात बेकायदेशीररित्या गांजा वनस्पतीची लागवड जोपासना करुन व संवर्धन करुन 273 किलो 850 ग्राम वजनाचा ऐकुण अंदाजे किंमत 16,43,100 रुपये असुन 585 ओली मुळासकट हिरवी गांजाची झाडे असा एनडीपीएस गुन्हाचा माल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळवून असुन आरोपी सुखलाल जाधव वय 58 वर्ष राहणार टिटवी ता सोयगाव यांना ताब्यात घेण्यात आले आहे व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत मोरे, पोलीस कॉन्स्टेबल भरत कोळी सोयगाव नायब तहसीलदार, कृषी सहाय्यक मानसिंग भोले,व ग्रामीण विशेष पथकाचे अधिकारी हजर होते ..