टोम्पे महाविद्यालयात दादासाहेब टोम्पे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

 




विद्यार्थ्यांनी दादासाहेब टोम्पे सारखे आदर्शवत जीवन जगावे

       - प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख 


मयुर खापरे चादुंर बाजार


  चांदूरबाजार येथील गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे संस्था मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष केशवरावदादा उर्फ दादासाहेब टोम्पे यांच्या 82 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध वक्ते, कीर्तनकार प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अरविंद देशमुख, संस्थेचे अध्यक्ष मा. भास्करदादा टोम्पे, संस्थेचे सचिव डॉ. विजय टोम्पे, प्राचार्य डॉ. संजय शेजव, प्राचार्य मनीष सावरकर, डॉ. नंदकिशोर गव्हाळे, प्राचार्य तुषार खोंड, डॉ. रवींद्र डाखोरे प्रामुख्याने उपस्थित होते. या अभिष्टचिंतन सोहळ्याची सुरुवात स्व. गोविंदरावदादा टोम्पे व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून कार्यक्रमाचे संयोजक डॉ. रवींद्र डाखोरे यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका सविस्तर मांडून प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख 'मी प्रेरणा घेणारच' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आदरणीय दादासाहेब टोम्पे यांना मी गेल्या तीसबत्तीस वर्षापासून पाहतो दादासाहेब हे अतिशय संवेदनशील, निर्मळ मनाचे, सुस्वभावी आणि कर्तृत्ववान व्यक्तीमत्व असून त्यांनी हमेशा जीवनात सामाजिक बांधिलकी जपल्याचे सांगितले तसेच पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आपल्या आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून मेहनत घेतल्यास आपण यशाच्या शिखरावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक माणूस हा गरिबीतूनच मोठा होत असतो तेव्हा आपल्या गरिबीचा बाऊ न करता विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे झाले पाहिजे असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. विजय टोम्पे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यासमोर चांगले आदर्श घेऊन मार्गक्रमण केल्यास आपले व आपल्या आई वडिलांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल असे म्हणाले. शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी दादासाहेब टोम्पे यांच्या सुस्वभावी व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सांगून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रियदर्शनी देशमुख यांनी केले तर आभार प्राचार्य मनीष सावरकर यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post