55 व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्ताने भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे उदघाटन संपन्न
विविध कार्यक्रमांनी साजरी होणार तीन दिवशीय पुण्यतिथी
डॉ सतीश वारजूकर चिमूर विधानसभा समनव्यक यांच्या प्रमुख उपस्थितीत भजन स्पर्धेचे उदघाटन संपन्न
चंद्रपूर / चिमूर , सुनिल कोसे : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीत राष्ट्रसंताच्या 55 व्या पुण्यतिथी निमित्य खंजेरी भजन स्पर्धा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दि 11 ऑक्टोबर भव्यदिव्य अश्या भजन स्पर्धेचे उदघाटन 74 चिमूर विधानसभा समनव्यक डॉ सतीश वारजूकर यांच्या हस्ते पार पडले महिला व पुरुष या दोन्ही स्पर्धकांच्या भजनांनी तपोभूमी परिसर भक्तिमय झाला होता त्यामुळे रात्रभर तपोभूमी ही वंदनीय राष्ट्रसंताच्या भजनात रंगली होती.
वंदनीय महाराजांच्या 55व्या पुण्यतिथी निमित्ताने ग्रामवाशी गोंदेडा व गुंफा समिती च्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून तीन दिवसीय पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून बुधवारला पुण्यतिथी महोत्सव ला डॉ सतीश वारजूकर यांच्या हस्ते भजन स्पर्धेचे उदघाटन करून सुरवात झाली दि 11 ला सकाळी ग्रामसफाई श्रमदान सामुदायिक ध्यान प्रार्थना करून पुण्यतिथी ला सुरवात झाली.
महिला मेळावा व्यसनमुक्ती राष्ट्रसंताचे विचार दर्शन रामधून कीर्तन पालखी मिरवणूक ध्वजारोहण मौन श्रद्धांजली गोपाळकाला राष्ट्रवदांना महाप्रसाद असे अनेकविविध कार्यक्रमांनी पुण्यतिथी साजरी होणार आहे महिला विभाग व पुरुष विभाग खंजेरी भजन स्पर्धेला विधानसभा समनव्यक डॉ सतीश वारजूकर यांच्या काडून आकर्षक पारितोषिक आयोजित केले आहे.
या उदघाटन सोहळ्याला महासचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी सेवादल प्रा. राम राऊत सर, अध्यक्ष युवक कांग्रेस चिमूर विधानसभा तथा माजी सभापती पं.स.चिमूर, सरपंच गिरजा गायकवाड,गुंफा समिती अध्यक्ष विठ्ठल सावरकर सर,घनश्याम चाफले,आत्माराम आंबोरकर,माजी सरपंच मधुकरजी वाढई, रघुनाथ धारणे, विठ्ठल वाढई,प्रशांत मगरे, प्रवीण वाघे,मिलिंद वाढई,पोलीस पाटील अविनाश बावणे, चौधरी महाराज,लोनबले सर,अनेक गावातील भजन मंडळी गावकरी महिला पुरुष बालगोपाल उपस्थित होते