सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांची धडक कारवाई
जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
दि.१४/१०/२०२३ रोजी १६.३० वाजता पोलीस ठाणे सांवगाव हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून केसेस करणे कामी पोना बरडे, पोकाँ
कोळी, पोकाँ तायडे व चा पोहेकॉ मिर्झा असे शासकीय वाहनाने रवाना झाले असता सोयगाव येथिल बसस्टैंडर आले असता पोकाँ तायडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सोयगाव येथिल विश्व कल्याण मल्टीस्टेट को. ऑ. संस्थेच्या बाजूला दुकानात काही इसम लोकांकडुन पैसे घेवून कल्याण मुंबई नावाचा जुगार खेळ खेळत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने सदरची माहिती सपोनि केदार यांना देवून छापा कारवाई करण्याचे आदेशीत केल्याने दोन पंचांना बोलावुन त्यांचे सोबत मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी ४.५० वाजता छापा मारला असता तेथे रामेश्वर काशिनाथ गुजर, रा. आमखेडा, ज्ञानेश्वर गजमल इंगळे, विष्णु वाल्मीक सोनवणे, पंडीत दामु तायडे, तिघे रा. गलवाडा यांना जागीच पकडण्यात आले असुन त्यांचे अंगझडतीत जुगाराचे साहित्य, एकूण ७८१९०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्यांचेविरुध्द पोलीस ठाणे सोयगाव येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोना बरडे हे करीत आहेत सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया छत्रपती संभाजीनगर ग्रामीण,अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेदार , छत्रपती संभाजीनगर ग्रामीण व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे साहेब, उपविभाग सिल्लोड यांचे मार्गदर्शनाखाली सोयगाव पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे.