श्रीकांत राऊत यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
महागाव : शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये पंचशील ध्वजाजवळ विविध प्रकारचे शंभर वृक्ष लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाला महागाव नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक सुजित ठाकूर यांचे सह सर्व समाजाचे बांधव उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ११ च्या भाजपाच्या नगरसेविका आशाताई शंकर बावणे, संजय कावळे, प्रवीण कावळे, राजू भगत, आकाश कावळे, रमेश सांगडे, धर्मपाल भद्रे, राहुल तायडे, सुधाकर सांगडे, मनोहर देवडे, हरिभाऊ मुनेश्वर यांच्यासह महिला मंडळाच्या करुणा कावळे, स्वाती कावळे, बेबी कावळे, सुनंदा कावळे, गंगा सांगडे, विमल सांगडे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला होता. या वृक्षारोपण कार्यक्रमाला सर्व समाजाचे बांधव उपस्थित होते.