श्रीकांत राऊत यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
महागांव : शालेय क्रीडा व शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत थ्रो बॉल या खेळामध्ये मातोश्री विद्यालयाच्या पाच संघांनी विभागीय स्पर्धेसाठी धाव घेतली व जिल्ह्याची नेतृत्व करण्याची संधी प्राप्त केली यामध्ये १४ वर्ष संघ मुले व मुली, १९ वर्ष मुले व मुली, १७ वर्ष मुली १४ वर्षे मुलीचा संघ सहभागी झाला होता.
संघाचे नेतृत्व प्रगती पहुरकर हिने केले तर १७ वर्ष मुलीच्या संघाचे नेतृत्व निर्मिती व्यवहारे १९ वर्ष मुलीचे नेतृत्व दिव्या देशमुख १९ वर्ष मुलाच्या संघाचे नेतृत्व भार्गव रानडे तर १४ वर्षे मुलाच्या संघाचे नेतृत्व शिवा नेवारे यांनी अतिशय परिश्रम घेऊन विजय खेचून आणला. संघाचे मार्गदर्शक म्हणून प्रा.अश्विन जाधव अमोल खोसे व रवी भांगे यांनी प्रशिक्षण देऊन दर्जेदार संघ निर्मिती केली. विजय खेळाडूंचे कौतुक संस्थापक दिगंबर जगताप यांनी केले. विद्यालयाचे सर्व कर्मचारी वृंद व पालक वर्ग यांनी विजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व पुढील खेळासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.