पोलिसांसोबतच महावितरण कर्मचाऱ्यांची टीम सुद्धा हजर होती
चादुंरबाजार प्रतिनिधी मयुर खापरे
चांदूरबाजार शहरात 2 ऑक्टोबर रोजी गणेश विसर्जनाची सांगता झाली लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी चांदूरबाजारवाशी यांनी जोरदार तयारी केली असून पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्ताची नियोजन चांदूरबाजार ठाण्याचे निरीक्षक सुरज बोंडे यांनी पूर्ण केले. त्यासोबतच महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपले कर्तव्य बजावत आपली कामगिरी पार पाडली
चांदूरबाजार शहरवासीयांनी १९सप्टेंबर रोजी बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले गणरायाच्या आगमनानेमुळे सर्वत्र मांगल्ये चैतन्य आणि प्रसन्नतेचे वातावरण शहरात तयार झाल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता यंदा लहान मोठे अंदाजे शहरात १८ते २० गणेश मंडळांनी श्री गणेश मूर्तीची स्थापना केली त्यापैकी चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीत एक गाव एक गणपती असे १७ गावात संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात आली गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक, लोकप्रयोगी, आरोग्यदायी ,उपक्रम राबविण्यात आले असून आकर्षक देखावे व रोषणाईचे सर्वांचे लक्ष वेधून घ फटाक्यांची आतिषबाजी करीत डीजेच्या जल्लोषात चांदूरबाजारवाशीयांनी बाप्पाला सोमवारी निरोप दिला या मिरवणुकीत दहा सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला.
शहराच्या पारंपारिक विसर्जन मार्गावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या दहा सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती मिरवणुकीत होते हे मिरवणूक सीनाबाई मंदिर, फुले चौक, कोंढवा चौक ,गाडगे नगर, या मार्गाने नेताजी चौक ते जयस्तंभ चौक येथे वेळेतच वाद्य वाजवून बंद करण्यात आले.