औरंगाबाद जिल्हा बँकेच्या वतीने शेतकरी मेळावा संपन्न

 


औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख


सोयगाव तालुक्यातील डाभा येथे दि.१/१२/२२ गुरुवार रोजी दि.औंरगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सावळदबारा यांच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी हात देणे, हेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ध्येय आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काटेकोर नियोजन व धोरणामुळे ही परिस्थिती सुधारली.अशी माहिती शेतकऱ्यांना नामदेव मानसिंग चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिली.

 ‘शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी हात देणे, हेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ध्येय आहे. आगामी काळात ग्राहकांना, शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी बॅँकेच्या आणि नवीन तंत्रज्ञान वापरावर भर देऊ,’ शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सावळदबारा शाखेत खाते उघडून शेतकऱ्यांनी आपला नेहमीत व्यावहार केला पाहिजेत अशी माहिती रत्नाकर ऊमरे यांनी ग्रामस्थांना बोलताना दिली.बँकेची आर्थिक स्थिती, भविष्यातील योजनांसह विविध विषयावर शेतकऱ्यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रदीप रोकडे म्हणाले, ‘ग्रामीण भागातील लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी जिल्हा सहकारी बँक हा अंत्यत जिव्हाळ्याचा विषय आहे. अडीअडचणीत बँकेकडून होणारी मदत हे त्यामागील कारण. ही बँक सभासद-शेतकऱ्यांच्या पाठबळामुळे आज प्रगतीपथावर आहे. अशा विविध योजना विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.याप्रंसगी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी नामदेव मानसिंग चव्हाण, प्रदीप रोकडे, रत्नाकर उंबरे,सुखदेव गवळे,करतार चव्हाण, सरपंच राहुल हेलोडे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व शेतकरी मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post