चंद्रपूर✍️दिनेश झाडे
चंद्रपूर : महिलांचे सक्षमीकरण झाले पाहीजे तर महिलांची प्रगती होईल महिलांनी चुल आणि मुल यावरच न थांबता महिलांना आता समान अधिकार मिळाला आहे अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी चंद्रपूर येथील पिरिपाच्या महिला मेळाव्यात केले पिरिपा प्रणीत रमाई महिला ब्रिगेडमहसुल भवन.चंद्रपूर येथे पिरिपाचे जिल्हा अध्यक्ष हरिष दुर्याधन हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा .जोगेंद्र कवाडे सर चरणदास इंगोले युवा नेते भाई जयदीप कवाडे रमाई बिगेडच्या प्रदेशाध्यक्षा रत्नाताई मोहोड आदी लाभले होते . याप्रसंगी रत्नाताई मोहोड म्हणाला की आता महिलांनी घाबरून चालायचे नसते आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा आपण प्रतिकार केला पाहीजे तसेच महिलांनी शासनाचा विविध योजना आपल्या पदरी पाडल्या पाहीजेत तरच आपण सक्षम होवू . याप्रसंगी भाई जयदिप कवाडे चरणदास इंगोले आदीची पिरिपा पक्ष वाढीबाबत भाषणे झालीत. कार्यक्रमाच्या संयोजिका वंदना सुर्यवंशी ह्या होत्या पिरिपाच्या महिला मेळाव्यास जिल्हयातून बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .