निलेश रामगावकर / अमरावती जिल्हा प्रतिनिधी
तळेगाव दशासर:- स्थानिक येथील कृषक सुधार मंडळ द्वारा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष स्व. बापूसाहेब देशमुख यांची ११७ वी जयंती मोठ्या उत्साहात माध्यमिक कन्या विद्यालय तळेगाव दशासर येथे पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष शिवाजी देशमुख यांनी भूषविले, प्रमुख अतिथी म्हणून प्रा. वीरेंद्र जगताप माजी आमदार , बेबी उईके सभापती प.स. धामणगाव रेल्वे, जयश्री शेलोकर उपसभापती, अनिता मेश्राम माजी जिल्हा परिषद सदस्य, मीनाक्षी ठाकरे सरपंच, शुभांगी देशमुख, संजय काळबेंडे, भूपेंद्र नाईकनिंबाळकर उपाध्यक्ष, विनोद रामेकर, रवींद्र देशमुख, मोहन देशमुख, डॉ. विनोद देशमुख, आनंद देशमुख सचिव कृषक सुधार मंडळ,
बाळासाहेब ढोबळे, नरेश ढोबळे, उपस्थितीत होते.
तसेच ग्रामपंचायत येथील सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक/पालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वीरेंद्र जगताप यांनी बापूसाहेबांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याला मनोगतातून उजाळा दिला.
जयंती निमित्त कृषक सुधार मंडळ च्या वतीने कृष्टरोगी आश्रम काशीखेड येथील लाभार्थाना ब्लॅंकेट वाटप नानासाहेब देशमुख मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह तळेगाव येथील विध्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप व माध्यमिक कन्या विद्यालय च्या विद्याथिनींना गणवेश शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जयंती निमित्त विध्यालाया मध्ये क्रीडा स्पर्धा, रंगभरण, रांगोळी, चित्रकला स्पर्धा, घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कृषक सुधार मंडळ द्वारा संचालित तीनही संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.