जि.प.उच्च प्राथ.शाळा सिदूर येथे भारतीय संविधान या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन

 


सुविद्या बांबोडे सहायक संपादिका 

         प्रदेश व जिल्हा तसेच करुणाई बहुदेशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिना निमीत्त १ डिसे. २०२२ ला जिल्हा परिषद शाळा सिदूर येथे भारतीय संविधान या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवत कार्यक्रमाचे व स्पर्धेचे उत्तम आयोजन केले. दुपार सत्रात बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या मुख्य प्रमुख पाहुण्या करुनाई बहुदेशीय संस्था व काँग्रेस अनुसूचित जाती विभाग च्या जिल्हाध्यक्षा निशाताई धोंगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःला दुःख सहन करण्याची सवय बालपणापासून मिळाली आणि सोबतच संविधानाची ग्रामीण भागात जागृती होणे का गरजेचे आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग च्या महिला अध्यक्षा अश्विनी खोब्रागडे यांनी अध्यक्ष स्थान भूषवत विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सोबतच गुड टच, बॅड टच याविषयी सखोल मार्गदर्शन केले.बांबोडकर सरांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत महापुरुषांच्या कार्याची पुनरावृत्ती केली.मुख्याध्यापक मा.कुकुटकर सर यांनी चांगल्या संस्काराची रुजवणुक ही बालवयातच होते, यशस्वी होण्यासाठी काय कष्ट करावे लागतात ही भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केली.या स्पर्धेत प्रथम क्रमांक आक्रोश भोयर,द्वीतीय क्रमांक सोनीया नगराळे,तृतीय क्रमांक अनुष्का सुर्तीकर, प्रोत्साहनपर बक्षीस स्वरा बाविस्कर या विद्यार्थिनीने मीळवला.या सर्व विजेत्या स्पर्धकांना स्मृती चीन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेचा सन्मान म्हणून मुख्याध्यापक श्री. कुकूटकर सर यांना संविधानाची प्रत व शाल देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राजानंद दुधे सर तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.अविनाश जुमडे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत वामनदादा कर्डक यांचे सांगा आम्हाला बिर्ला बाटा....हे गीत गायन केले व उपस्थितांचे जि.प.उच्च प्राथ.शाळा सिदूर तर्फे आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग च्या महिला अध्यक्षा अश्विनी खोब्रागडे, करुनाई बहुदेशीय संस्था व काँग्रेस अनुसूचित जाती विभाग च्या जिल्हाध्यक्षा निशाताई धोंगडे,मुख्याध्यापक श्री.उमेश कुकुटकर, धोंगडे साहेब अध्यक्ष Bams WCL,लिना आवळे, सुधांशू बंडीवार,राजानंद दूधे, अविनाश जुमडे, गानफाडे उपसरपंच सिदूर,शाळेतील विद्यार्थी उपस्थिती होते.

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाला पूर्णविराम देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post