गाव सहेली रुचिका वानखडे
पुणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
इंडियन कौन्सिल फॉर प्रोफेशनल एज्युकेशन मिशन या संयुक्त राष्ट्र संघाच्या ( U N O ) मॉडेल वर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व निती आयोग मान्यता प्राप्त संस्थेमार्फत बाल मानस शास्त्र व समुपदेशन या विषयात परीक्षा घेतल्या जातात. अलीकडेच झालेल्या परीक्षेत कलमाडी प्री प्रायमरी स्कूल, एरंडवणे ( पुणे) येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. स्नेहा अभिजीत कुलकर्णी यांनी तब्बल ९२ % गुण मिळवून विशेष प्राविण्यासह
घवघवीत यश संपादन केले आहे. सौ. कुलकर्णी या संगीत विशारद असून लहान मुलांतील सुप्त कला
कलागुणांना प्रोत्साहन देऊन सुजाण व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या दृष्टीने त्या सतत प्रयत्नशील असतात. शाळेतील सर्व शिक्षक वर्गानी सौ. स्नेहा कुलकर्णी यांच्या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.