आधार राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रला(आधार इंडिया)जनजागृतीचा"राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार२०२२"प्रदान

 


डोंबिवली-कौशल्यातुन स्वावलंबन,महिला सबलिकरण,उद्योजकता विकास,शासकीय निमशासकीय योजनांची माहिती,सुशिक्षित बेरोजगारांसाठी करियर मार्गदर्शन,बचत गट,पास नापास विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक डिग्री डिप्लोमा तसेच सर्टिफिकेट परिक्षा अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन असे विविध प्रकारचे कार्य कौशल्य उपक्रम या आधार इंडियाकडुन राबविले जातात.त्यांच्या या अद्वीतीय कार्याची दखल जनजागृती सेवा समितीने घेऊन त्यांच्या संस्थेला "राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार२०२२"नुकताच त्यांना समारंभपुर्वक प्रदान करण्यात आला.आधार इंडियाच्या रेतीभवन,डोंबिवली(प)येथील कार्यालयात हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर व संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर यांच्या हस्ते आधार इंडिया ट्रान्सफाॅरमेशन काऊन्सिलचे उपाध्यक्ष डाॅ.अमित दुखंडे यांजकडे संस्थेचा "राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार२०२२"सुपूर्त करण्यात आला.याप्रसंगी आधार राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्राचे(आधार इंडिया)पदाधिकारी श्री.गुरुराज कुळकर्णी,रत्नाकर यरेंडकर,दिपक बारिया,तुषार साटम,शैलेश वाडकर हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post