सोयगाव येथे होमगार्ड संघटनेचा ७६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

 


      औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख


औरंगाबाद : सोयगाव येथील होमगार्ड पथक कार्यालय सोयगावच्या वतीने आज दि.८ गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा ७६ वा वर्धापन दिनानिमित्त सोयगाव शहरातील पंचायत समिती आवार,व छत्रपती शिवाजी महाराज चौक,बसस्थानक परिसर,सोयगाव न्यायालय परिसर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले व ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार,व सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनाजी खंदारे,डॉ.आबेद शेख,सोयगाव होमगार्ड पथाकाचे प्रभारी प्रमुख कृष्णा शेवाळकर,अंशकालीन शिपाई योगेश बोखारे सह आदी होमगार्ड यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.



    तसेच यावेळी सोयगाव न्यायालयाचे न्यायाधीश अमोल इंगोले यांनी होमगार्ड वर्धापन दिनाच्या होमगार्ड संघटने विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.व सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी सोयगाव होमगार्ड पथकातील जवानांना होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व सोयगाव वकील महासंघाचे अध्यक्ष ॲड.राजेश भैय्या गिरी यांनीही होमगार्ड जवान यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी अशकालीन लिपीक कृष्णा शेवाळकर,अंशकालीन शिपाई योगेश बोखारे,संदिप सुरडकर,विशाल घन,विष्णू गव्हाणे,शाम एन्डोले,ज्ञानेश्वर नागपुरे,विनोद इंगळे,साहेबराव सोनवणे,दीपक घन,किरण सपकाळ,श्रीराम जोहरे,ज्वालासिंग बडगुजर,इमरान शेख,सतीश मंडवे,कडूबा बावस्कर,शांताराम मिसाळ,विष्णू गव्हाणे,विजय सोनवणे,दिनेश काळे,दीपक कुल्ली,गजानन बागुल,भीमराव दनके,संदीप आहीरे,बापू लवाळे,हिरालाल ठाकरे,वसीम शेख,बापू वारंगणे,बापू घनगाव,संतोष घनगाव,अंकुर बि-हारे,भारत घन,सुधाकर पवार,अनंत लवटे,महिला होमगार्ड निर्मला लाड,आशा सानवणे,संगीता साळवे,आदीसह होमगार्ड यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Post a Comment

Previous Post Next Post