खामगाव/भीमराव खंडारे - वंचित बहुजन युवक तालुकाध्यक्ष अमोल शेगोकार यांच्या नेतृत्वामध्ये भाजपा नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ९/१२/२०२२ रोजी पैठण येथे आयोजित कार्यक्रमात " कर्मवीर भाऊराव पाटील, म.जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांकडे भिक मागुन शाळा चालू केल्या असे वादग्रस्त विधान करून या महापुरुषांचा अवमान केला आहे. वारंवार भाजपाकडून होणाऱ्या महापुरुषांच्या अपमानामुळे राज्यात बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जाऊन संपुर्ण राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात सुव्यवस्था बिघडवणारे भाजपा नेते मनोरुग्ण आहे त्यामुळे त्यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करून नागपूर येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यात यावे.
तसेच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध नोंदविणारे पुणे येथील पिंपरी चिंचवडच्या आंबेडकरी चळवळीतील तरुणांना राजकीय सत्तेचा दुरूपयोग करून 307 आणि 353 गंभीर गुन्हा मनोज भास्कर घरबडे, धनंजय भाऊसाहेब इजगज, विजय धर्मा ओव्हळ या युवकांना वरिल दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे. सदर पिंपरी चिंचवड मधील घडलेली घटना या पुर्णपणे भाजपा नेते जबाबदार आहेत, असे असतांना सुध्दा सदर घटनेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत ११ कर्मचारी निलंबित केले त्यांचे निलंबन त्वरीत मागे घेण्यात यावे. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जो निषेध नोंदवला त्या निषेधाचा व्हिडीओ आणि बातमी बनवून पत्रकार गोविंद वाकडे आंदोलकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या पत्रकारावर सुध्दा राजकीय द्वेषातुन दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्याबाबत सर्व महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा वंचित बहुजन युवक आघाडी खामगाव तालुका वतीने या विरोधात लोकशाही मार्गाने आक्रमक स्वरुपात आंदोलन छेडण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल याची आपण नोंद घ्यावी अशा प्रकारचे वंचित बहुजन युवा आघाडी खामगाव तालुक्याच्या वतीने मनोरुग्ण भाजपा भिक फंड आंदोलन करून तहसील खामगाव येथे निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे,तालुका अध्यक्ष प्रभाकर वरखेडे,शहर अध्यक्ष धम्मपाल नितनवरे,मा.ता.अध्यक्ष संघपाल जाधव,कृ.ऊ. बा.स.संचालक राजेश हेलोडे,महिला जिल्हाध्यक्ष विशाखा ताई सावंग,युवा तालुकाध्यक्ष अमोल शेगोकार, युवा ता.महासचिव चंद्रकांत टेरे,भा.बौ.महासभा शहर अध्यक्ष दादाराव हेलोडे,एकनाथ हिवराळे,विष्णू गवई,पवन तेलंग,नितीन सूर्यवंशी, गिरीश उमाळे,वैभव हिवराळे,प्रशांत वाकोडे,ईश्वर इंगोले,मिलिंद शिरसाट,कस्तुरबाई भटकर,लताबाई हिवराळे,शीलाबाई सरकटे, जिजाबाई वानखेडे, सुनंदा गव्हांदे,सत्यभामा इंगळे व इ.शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.