मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी नांदेडमध्ये महाविकास आघाडीची कार्यकर्ता बैठक






डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या प्रचारार्थ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन; विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित




नांदेड : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे कार्यकर्ता बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले.

दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत प्रचाराचे नियोजन, पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचणे आणि संघटनात्मक पातळीवर समन्वय साधणे याबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉ. माधवराव किनाळकर, नांदेडचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, पक्ष निरीक्षक बसवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठलराव पावडे, भीमराव हत्तीआंबिरे, काँग्रेस नेत्या डॉ. रेखाताई चव्हाण, माजी उपमहापौर आनंदराव चव्हाण, नगरसेवक मुन्ना अब्बास, काँग्रेसचे महेश देशमुख आदी उपस्थित होते.

तसेच नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव व प्रकाश राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडूसिंग नाईक, प्रवीण मॅक्कलवार, किनवट विधानसभा अध्यक्ष अनिल कऱ्हाळे, उखंडराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रमेश पाटील गावंडे, माहूर तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शेख तुराबअली, गजानन पाटील सोळंके, नावेद खान, निखिल जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला गती देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यावर भर देण्यात आला.





Post a Comment

Previous Post Next Post