श्रीक्षेत्र माहूर: बँकांनी सिबील खराब असल्याच्या कारणावरून खरीप रब्बी पिक कर्ज नाकारणे फायनान्स कंपन्यांनी शंभर रुपये बाकी असले तरीही केलेले सिविल खराब दुष्काळी अनुदान यासह इतर मागण्यासाठी पालाईगुडा येथील तलावातील पाण्यात उभे राहून शेतकऱ्यांनि बॅंकेच्या विरोधात घोषणाबाजी करत जलसमाधी आंदोलन केले.
अनेक दिवसापासून निवेदन देऊन शेतकऱ्यांनी मागण्या लावून धरल्या होत्या.भारतीय स्टेट बँक माहूर, सारखणी, मांडवी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक माहूर,वाई, उमरी या बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल खराब, सामायिक क्षेत्र, भोगवटा वर्ग-२ आणि महिला बचत गट खरीप व रब्बी हंगामाचे पिक कर्ज एकत्रित देण्यास टाळाटाळ करत खोटी कारणे सांगितली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ मे २०२५ रोजी स्पष्ट आदेश दिला असूनही की "पीक कर्जासाठी सिबिल मागू नये", तरीही बँका ऐकत नाहीत सिबिल वर्ग-२, सामाईक क्षेत्र यासारख्या सर्व जाचक अटी रद्द करून सरसकट पीक कर्ज मंजूर करावे खरीपचे थकीत कर्ज आणि रब्बीचे नवीन कर्ज एकत्र द्यावे आरबीआय चा नियम पाळावा.
खासदार हेमंत पाटील आणि आमदार भीमराव केराम यांच्या शिफारस पत्रांचा आदर करावा जोपर्यंत कर्ज मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असे सांगितले शेतकऱ्यांनी तलावात रांगा करून फलक हाती घेतले होते. "शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेच पाहिजे सिबिलची अट रद्द करा" अशा घोषणा दिल्या आता शासन आणि बँका यावर काय निर्णय घेतात याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
माहूर तालुक्यातील १५ हून अधिक गावातील शेतकरी आंदोलन स्थळी उपस्थित होते यावेळी रवि उत्तम राठोड जिवला नाईक साहेबराव जाधव, दिनेश राठोड, कवरसिंग राठोड, रमेश राठोड, अरविंद चव्हाण सरपंच अर्जुन आडे, भारतीबाई पवार, यशवंत जाधव, मिलिंद पडगिलवार त्यांचे सह महिला शेतकऱ्यासह इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



