धानोरासिख : येथील सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत चेअरमनपदी कोवे माणिक भीमराव, तर उपाध्यक्षपदी कुमरे सुभाष किशनराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. एल. जी. अय्यर यांनी निवडणुकीचे संपूर्ण कामकाज सांभाळले. दोन्ही पदांवरील निवड बिनविरोध झाल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण झाली.
या निवडीमुळे नवनिर्वाचित चेअरमन कोवे माणिक भीमराव व उपाध्यक्ष कुमरे सुभाष किशनराव यांच्यावर संस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

