Gavakadachibatmi| तळेगाव दशासर ग्रामपंचायतीच्या आमसभेत गॅस वितरकाच्या विरोधात ठराव

 


विभागीय संपादक निलेश रामगावकर 

Amaravati,तळेगाव दशासरः येथील ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या आमसभेत घरगुती गॅस वितरणाबाबत नागरिकांनी तक्रारी मांडत संबंधित गॅस वितरकाच्या मनमानी कारभाराचा मुद्दा उपस्थित केला. घरगुती गॅस सिलिंडर वितरण करताना निर्धारित रकमेपेक्षा अधिक पैसे घेतले जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी आमसभेत केली.

गॅस सिलिंडर घरपोच देताना ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित गॅस वितरकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमसभेत करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत ग्रामपंचायतीच्या आमसभेत चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला असून, संबंधित विभागाकडे हा ठराव पाठविण्यात आला आहे.

आता संबंधित विभाग या तक्रारीची चौकशी करून गॅस वितरकाविरुद्ध कोणती कारवाई करणार? याकडे तळेगाव दशासर येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे, तसेच ग्राहकांकडून निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्यास त्यावर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





Post a Comment

Previous Post Next Post