विभागीय संपादक निलेश रामगावकर
Amaravati,चांदूर बाजार : तालुक्यातील देऊरवाडा परिसरातील शेतशिवारात वाघिणीचा वावर आढळून आल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात वाघिणीने दोन गायींची शिकार केल्याची माहिती समोर आली आहे.
वाघिणीच्या वावरामुळे शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकरी व मजुरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून वाघिणीचा शोध घ्यावा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहावे, रात्रीच्या वेळी तसेच एकट्याने शेतशिवारात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
