यवतमाळ | राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास मंत्र्यांचे अभिवादन

 





यवतमाळ : आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार राजू तोडसाम आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांनीही राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजे उमाजी नाईक यांच्या शौर्य आणि क्रांतिकारी कार्याचे स्मरण केले.

Post a Comment

Previous Post Next Post