राष्ट्रीय बौद्ध महासभेचे २० वे राष्ट्रीय अधिवेशन भुवनेश्वर येथे

 





प्रदीप कुमार सावते,किनवट तालुका प्रतिनिधी तथा निर्मल जिल्हा विशेष प्रतिनिधी (तेलंगाणा)


किनवट, दि. ३१ जुलै २०२६ : राष्ट्रीय बौद्ध महासभेचे २० वे राष्ट्रीय अधिवेशन ११ ते १५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान कलिंग, भुवनेश्वर (ओडिशा) येथे आयोजित करण्यात आले आहे.


अधिवेशनाच्या निमित्ताने १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून, १४ ऑक्टोबर रोजी लाखो अनुयायांच्या उपस्थितीत राष्ट्रीय विशाल अशोक धम्म विजयादशमी दीक्षा समारोह आयोजित करण्यात आला आहे.


RBM चे संस्थापक धर्मप्रकाश भारतीय बौद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशनाची तयारी सुरू असून, राष्ट्रीय अध्यक्ष बी. एस. बौद्ध, राष्ट्रीय उपाध्यक्ष इंजि. रमेशचंद्र बनगोत्रा यांच्यासह राष्ट्रीय पदाधिकारी, २८ प्रदेशाध्यक्ष, धम्मसेवक संघ, महिला आघाडी व सामाजिक न्याय परिषदेचे पदाधिकारी नियोजनात सहभागी झाले आहेत.

अधिकाधिक नागरिकांनी अधिवेशनात सहभागी होऊन तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. आनंद भालेराव, राष्ट्रीय महासचिव तथा प्रभारी भारत यांनी केले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post